व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ;या तारखेपर्यंत करा अर्ज

Battery Sanchalit Favarni Pump : सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे आहे.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in –>farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा Battery Sanchalit Favarni Pump अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज करण्याची पद्धत 

  • लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे
  • “अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे
  • “कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे
  • “मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे
  • “तपशील” बाबीवर क्लिक करून –
  • “मनुष्यचलित औजारे घटक निवड”
  • “यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”
  • “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे
  • जतन करणे

अर्ज करणे साठी वेबसाईट : “https://mahadbt.maharashtra.gov.in

1 thought on “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ;या तारखेपर्यंत करा अर्ज”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा