व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयामध्ये पर्मनंट नोकरीची संधी; पगार 50000 रुपये, अर्ज करण्यासाठी फक्त …

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील शाखेंतर्गत चौथी पास वर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून स्वयंपाकी या पदासाठी ही भरती असणार आहे.

या पदासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराने त्यांच्या अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत, अर्जासोबत कागदपत्रे, प्रमाणपत्र, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह 16 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचतील या बेतांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत.

स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्या माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांक नंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

👉 पदांचा तपशील : स्वयंपाकी – 02 जागा

👉 शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी चौथी पास असावा, उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

👉 वयोमर्यादा : उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास विहित मार्गाने अर्ज करण्यास शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वयामध्ये शेतीला मिळणार आहे, उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा मागासवर्गीयासाठी कमाल मर्यादा 43 वर्षाचे असेल.

👉 अर्ज करण्याची पद्धत : अर्जाचा नमुना खाली लिंक वर दिलेला आहे तो अर्जाचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून उमेदवाराने 300 रुपयांच्या पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट सहित पाठवायचा आहे.

👉 अर्जाचे शुल्क : सदर पदासाठी तीनशे रुपये एवढे अर्जाचे शुल्क (Mumbai High Court Vacancy) असून हे शुल्क “Assistant Registrar for Registrar General High Court A.S. Bombay”  यांच्या नावे काढलेले असावे. ही रक्कम पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपातच असावी .

👉 निवड प्रक्रिया : आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सूची प्रमाणे पात्र उमेदवाराची मूल्यांकन पद्धत, तोंडी मुलाखत व शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेऊन उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • उमेदवाराने अर्ज सोबत स्वक्षांकित केलेल्या छायांकित प्रति सादर करावेत यामध्ये
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /दहावीचे प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • चौथी, दहावी, बारावी किंवा तत्सव डिप्लोमा
  • कोणत्याहि मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला.
  • अर्जदाराला बनवता येणाऱ्या पाककृतीची यादी सोबत जोडावी.
  • स्वयंपाकाच्या विशेषते संबंधीचा दाखला असल्यास अश्या उमदेवराला प्राधान्य देण्यात येईल.
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
  • विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत पाठवावा.
  • अर्ज सोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाच्या पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे.

👉 पगार : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 16600 ते 52400 व नियमाप्रमाणे भत्ते दिले जाणार आहेत

👉 अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, पाचवा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी रुग्णालयाच्या वर, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई 400001

उमेदवारासाठी सूचना (BHC Recruitment 2024)

  • जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची करण्याची सर्वाधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेले आहे.
  • अपूर्ण चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल तसेच कोणती वस्तूस्थिती दडपल्यास नाकारला जाईल.
  • केवळ पात्र उमेदवारांना स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी दोन्ही मुलाखतीसाठी नेमलेले तारखांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • उमेदवाराचे निवड हे स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केले जाईल.
  • उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी शैक्षणिक पातळीच्या बाबत माहिती भरताना उमेदवाराने त्याची तिची पात्रता खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी
    • चौथी
    • दहावी
    • बारावी किंवा तत्सम डिप्लोमा
  • या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेली निर्णय अंतिम असेल.

👉मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

👉अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

नवीन अपडेट पहा

Post Office Scheme 2024 : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन 5 वर्षात कमवा 12 लाख 30 हजाराचे व्याज ! वाचा सविस्तर

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा