Created by Aditya, Date : 08.12.2024
EPFO 3.0 Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ ने मोठी अपडेट जरी केलेली आहे, आतापर्यंत पीएफ अकाउंट मधून पैसे काढणे खूप अवघड जात होते. ऍडव्हान्स काढण्यासाठी सुद्धा भरपूर कालावधी लागत होता.
गरजेच्या वेळी पीएफ चे पैसे आपल्याला वेळेवर मिळत नव्हते अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने आता EPFO 3.0 उपक्रम राबवलेला आहे. जे पीएफचे सदस्य असतील त्या सदस्यांना एटीएम सारखे कार्ड दिले जाणार आहे.
त्या कार्डमधून सदस्य त्यांना लागेल तेव्हा पैसे काढू शकणार आहेत, पीएफ सदस्यांसाठी ही सेवा येत्या काही दिवसात लागू केल्या जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा भाग म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या योगदानामधील पेन्शन मध्ये वाढ करणार आहे.
पीएफ चे ATM कार्ड कोणाला मिळेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड देण्याचा निर्णय घेणार आहे त्यामुळे येत्या काही काळात तुम्ही तुमचे पैसे एटीएम मधून तुमच्या पीएफ अकाउंट मधून काढू (PF Claim Status) शकणार आहात.
ही योजना 2025 मध्ये मे किंवा जून महिन्यामध्ये लागू होण्याची शक्यता आहे. आता सदस्याला पीएफ चे पैसे काढण्यासाठी कमीत कमी एक आठवडा व जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते. पीएफची सगळी प्रक्रिया पूर्ण करून, सर्व कागदपत्रे अपलोड करून त्यासाठी आपल्याला खूप वेळ वाट पाहावी लागत आहे.
परंतु या निर्णयामुळे सदस्यांना गरजेचे वेळी पैसे मिळू शकतील पण एटीएम मधून सुद्धा पैसे काढण्यासाठी काही मर्यादा ईपीएफओ ठेवणार आहे, ईपीएफओ (EPFO) च्या सगळ्या नियमांचे पालन करूनच तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.
त्यामुळे तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये पेन्शनसाठी रक्कम राहील याची खात्री ईपीएफओ घेणार आहे सध्या नोकरदाराचा पीएफ 12% कापला जातो यामध्ये कंपनी सुद्धा 3.67% एवढे रक्कम आपल्या खात्यात जमा करते.
तर राहिलेले 8.33% रक्कम कंपनी पेन्शन खात्यामध्ये जमा करते आतापर्यंत जसा ऍडव्हान्स पीएफ आपण काढत होतो त्या ऍडव्हान्स पीएफ मध्ये आपले बारा टक्के व कंपनीचे 3.67% यातील रक्कम फक्त आपल्याला मिळत होती.
याच प्रकारे एटीएम द्वारे सुद्धा तुम्हाला तेवढीच रक्कम मिळू शकते परंतु या योजनेविषयी सविस्तर माहिती आपल्याला जून 2025 पर्यंत करणार आहे. ईपीएफओ (EPFO) कोणाकोणाला एटीएम कार्ड (ATM Card) देईल कशा पद्धतीने देऊ याची सविस्तर माहिती येत्या काही दिवसांमध्ये ईपीएफओ जारी करेल.