व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

मोठी बातमी…लाडक्या बहिणींना नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार डिसेंबर चे 1500 रुपये | Ladki Bahin Yojana Installment

Ladki Bahin Yojana Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दार महिना 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य शासनकडून करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलाच धारेवर धरलं आहे.

निवणडुकीत मतदान मिळविण्यासाठी ही योजना चालू केल्याचा आरोप विरोधक पक्ष सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. लोकसभेला महायुतीला अपयश मिळालं होत, म्हणून सरकारने ही आमिष म्हणून हि योजना सुरु केली असेही विरोधकांचं म्हणणं आहे, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर पलटवार केला आहे.

लाडकी बहीण नंतर आता सरकारची नवीन योजना;नागरिकांना 3000 रुपये मिळणार 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदे ANI शी मुलाखतीमध्ये म्हणाले, “लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चालत आहे,हि योजना एवढी प्रसिद्ध होईल असे विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी हे अनपेक्षित गोष्ट आहे. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहिते मध्ये अडकू नये यासाठी पात्र महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले आहेत.

पैसे कधी येणार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे. तर विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे, त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महिलांकडून या योजनेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक पण केलं जात आहे.ANI ला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले, लाडक्या बहि‍णींसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

महिलांना व्यवसाय करण्यासाठी 01 लाख ते 25 लाखांचे आर्थिक साहाय्य सरकार देणार;असा करा अर्ज

लाडक्या बहिणीला लखपती करणार

या योजनेच्या विरोधात काँग्रेससह व महाविकास आघाडीचे काही लोक न्यायालयात गेले आहेत. पण आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी फक्त 1500 रुपयेच नाही तर, त्यामध्ये वाढ करून आमच्या बहि‍णींना आम्ही येत्या काही दिवसात लखपती करू असे शिंदे म्हणाले.

पैसे कधी येणार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला, यावेळी ते म्हणाले, केंद्राने 1 रुपया दिला तर शेवटी येईपर्यंत लोकांना त्यातील15 पैसे मिळतात. मात्र आता मोदींनी 1 रुपया दिल्यावर शेवटच्या नागरिकाला एक रुपयाच मिळतो.

आम्ही सर्व मार्गदर्शक तत्वच पालन करुन या योजनेची अंमलबजावणी करत आहोत, कोणीही मायका लाल आला तरी हि योजना बंद करु शकणार नाही. या योजनेमुळे विरोधक पुरते घाबरले आहेत. ते म्हणतात, हि योजना आम्ही बंद करु आणि सत्ताधार्यांना तुरूंगात टाकू, पण अशा विरोधकांना माझ्या लाडक्या बहिणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत घरी बसवतील.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा