Created by Aditya, Date : 08.12.2024
Ladki Bahin Yojana Payment Update : लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातल्या लाखो महिला घेत आहेत आता या महिलांना पुढील हप्ता कधी येईल याची काळजी लागली आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल याची वाट पाहत आहेत.
हफ्ता कधी येईल याची माहिती अस्याप कोणाकडेच उपलब्ध नाही, सर्व पात्र महिला त्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दर महिना एवढी आर्थिक मदत सरकार तर्फे दिली जाते.
ही योजना 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर सुरू झाली होती या योजनेअंतर्गत राज्यातल्या 18 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळत होती या योजनेअंतर्गत सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 साठी ऍडव्हान्स पेमेंट दिले होते.
लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आला कि नाही चेक करा
परत महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून 2100 रुपये दिल्या जाणार आहेत, त्यानंतर महायुती चे सरकार प्रचंड बहुमताने निवडून आले.
आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकारच राज्यात असणार आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी येईल आणि किती येईल हे कळेल.
पैसे कधी येतील (Ladki bahin Yojana)
डिसेम्बरमधील पुढचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर महिलांना मिळू शकते असं सूत्रांकडून कळत आहे महिलांना किती हप्ता मिळेल याची अद्याप शाश्वती नसून 1500 रुपये कि 2100 हे सध्या तरी ठरलेले नाही.
मात्र राज्यातल्या काही आर्थिक स्रोताने त्यांचा अभ्यास करून विचार केला तर सध्या तरी 1500 रुपयेच हप्ता मिळेल असे वाटते, सरकार हि योजना बंद करणार नाही जे आश्वासन दिले आहे ते आश्वासन पाळणे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेले आहे.
त्यामुळे लवकरच हप्ता राज्यातल्या लाखो महिलांचा अकाउंटला हे पैसे जमा होऊ शकतात संक्रातीच्या आधी हा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो.
जर हा आता तुमच्या अकाउंटला जमा नाही झाला तर काही काळजी करायचे कारण नाही तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी बनवलेल्या 181 हेल्पलाइन नंबर वर कॉल करून हप्ता कधी मिळेल याची माहिती घेऊ शकता तसेच तक्रार सुद्धा करू शकता.