Post Office Scheme : जर तुम्हाला ही भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूप कामाची असेल.अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
असे असले तरी आजही भरपूर लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. पोस्टमधील हि गुंतवणूक सुरक्षित व खात्रीशीर परतावा देणारी असल्यामुळे लोक इकडे आकर्षित होतात.
पोस्ट ऑफिसची बचत योजना, बँकेची मुदत ठेव योजना, आवर्त ठेव योजना मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिला देखील या योजनांमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.अश्याच पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आपण ज्या बचत योजनेची माहिती घेणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमीत कमी पाच वर्षांच्या कालावधीत जवळपास 12,30,000 रुपयांचे व्याज मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेची माहिती पाहायची असेल तर खाली दिलेली ए टू झेड इन्फॉर्मेशन वाचा.
कोणती योजना आहे ?
आपण ज्या योजनेबाबत माहिती घेणार आहोत ती योजना आहे पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेविंग स्कीम. ही एक सरकारी बचत योजना आहे, या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते, पोस्ट ऑफिस मार्फत चालवली जाणारी हि एक ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे.
हि योजना 5 वर्षांची आहे म्हणजे यामध्ये ५ वर्षांसाठी ठराविक रक्कम टाकावी लागते. या योजनेत जास्तीत जास्त 30,00,000 रुपये आणि कमीत कमी 1000 रुपये गुंतवता येतात SCSS (Senior Citizen Saving Scheme) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2 टक्के व्याज दिले जात आहे.
12 लाख 30 हजाराचे व्याज कसे मिळेल?
जर तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त रक्कम म्हणजे 30 लाखांची रक्कम Post Office Scheme गुंतवली तर तुम्हाला 5 वर्षात 8.2 टक्के व्याज दराने 12,30,000 रुपये व्याज मिळणार आहे. गुंतवणूकदाराला दर ३ महिन्याला 61,500 रुपये व्याज म्हणून दिले जातील.
म्हणजे 30 लाख गुंतवणूक केली तर 5 वर्षानंतर गुंतवणूक करणाऱ्याला एकूण 42,30,000 ची रक्कम मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या व्याजदरानुसार 8.2 टक्के तुम्हाला 5 वर्षात 6,15,000 रुपयेच व्याज मिळणार आहे.
जर तुम्हाला ही योजना 5 वर्ष झाल्यानंतरही सुरु ठेवायची असेल तर तुम्ही मॅच्युरिटी नंतर तुमच्या खात्याचा कालावधी 03 वर्षांसाठी वाढवू शकता. पण मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला या योजनेचा कालावधी वाढवावा लागणार आहे.
मुदत संपल्यानंतर त्या तारखेला लागू होणाऱ्या व्याजदराने खात्यावरील गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळणार आहे हे व्याज कलम 80C अंतर्गत येणाऱ्या कर सवलतीचा लाभ देखील घेता येणार आहे.
1 thought on “Post Office Scheme 2024 : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन 5 वर्षात कमवा 12 लाख 30 हजाराचे व्याज ! वाचा सविस्तर”