व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Ramai Awas Yojana 2024 : रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज सुरु; पात्रता व आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज

Ramai Awas Yojana 2024 : रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांना पक्की घर देण्यात येत आहेत, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमय आवास घरकुल योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहभाग यांच्यामार्फत पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे.

अनुसूचित जाती व नव बौद्ध व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पनातून चांगले प्रकारचे पक्के घर बांधणे शक्य होत नाही, शहरातील वाढत्या किमतीमुळे येथे स्वतःचे घर घेऊ शकत नाही पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते.

यासाठी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नव बौद्ध लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत लाभ देण्यात येतो.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे शासन निर्णय जाहीर झालेले असून खालील दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामधून याविषयीची माहिती तुम्ही पाहू शकता.

👉योजनेसाठी पात्रता (Eligibility Ramai Awas Yojana 2024)

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नव बौद्ध संवर्गातील असावा.
  • महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी पंधरा वर्षे पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा महानगरपालिकेचे क्षेत्रात तीन लाख रुपये एवढे असावे.
  • दिनांक 01.01.1995 रोजी संरक्षित झोपडीदार म्हणून संरक्षण प्राप्त असलेले या योजनेत समावेश करण्यात येईल.
  • शासनाच्या आणि इतर कोणत्याहि गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • सदर योजनेचा लाभ पक्क्या घरावरील मजला बांधण्यासाठी पात्र राहणार नाही.
  • अर्जदाराचे अगोदर पक्के घर असेल तर असे अर्जदार पात्र राहणार नाहीत.
  • बांधकाम करतेवेळी आवश्यक परवानगी संबंधी क्षेत्रीय कार्यालय व समक्ष प्राधिकरण उपयुक्त परिमंडळ पुणे महानगरपालिका यांच्याकडून घेणे आवश्यक आहे.

👉आवश्यक कागदपत्रे

  • घरपट्टी, पाणीपट्टी या कागदपत्रापैकी एक
  • सक्षम प्राधिकारीने दिलेला जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
  • सक्षम पदाधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
  • जमिनी बाबतचा पुरावा सातबारा, उतारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र शक्यतो अर्जदारांची स्वतःची जागा असावी अथवा कच्या घराच्या जागी पक्के बांधकाम करण्यासाठी लाभ मिळेल.
  • याव्यतिरिक्त ०१.०१. 1995 च्या मतदार यादीतील नावाचा उतारा
  • निवडणूक मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • महानगरपालिका मालमत्ता झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडे कर भरलेल्या पावत्याची प्रत उमेदवाराने सादर करावे.

👉अर्ज कसा करावा 

रमाई आवास घरकुल योजना शहरीकरिता पुणे महानगरपालिकेचे वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध असून खालील लिंक वर सुद्धा अर्जाचा नमुना दिलेला आहे. उमेदवाराने सविस्तर अटी शर्ती व आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.

👉अर्ज सादर करण्याचे ठिकाण

वर नमूद केलेल्या पात्रता व अटी नुसार पात्र असला तर आपला परिपूर्ण अर्ज व कागदपत्र समाज कल्याण विभाग, दुसरा मजला, खोली क्रमांक २०६, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – 400005 येथे समक्ष दाखल करावा अथवा अर्जदाराने क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका येथे दाखल करून पोहोच पावती घ्यावे.

क्षेत्रीय कार्यालयाकडून जागा पाहणीनंतर झोपडपट्टी विभाग व बांधकाम विकास विभागाकडे अभिप्रायानंतरच अर्ज मंजुरीसाठी रमाई आवास घरकुल योजना समिती समोर सादर केले जातील.

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख

रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्जदाराने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करावेत.

☑️प्रसिद्धीपत्रक व ऑनलाईन लिंक : डाऊनलोड करा
☑️अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

📢इतर महत्वाची माहिती

जिल्हा परिषदेकडून कडबा कुटी यंत्र,रोटाव्हेटर,मोटार पंप,फवारणी यंत्र,डिझेल इंजिन व ताडपत्री वाटप;100% अनुदान | Jilha Parishad Yojana 2024

8 thoughts on “Ramai Awas Yojana 2024 : रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज सुरु; पात्रता व आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा