Women Startup Scheme : महिला नेतृत्वातील स्टार्ट अप्स ला विविध प्रकारच्या आव्हाने आणि अडथळांना सामोर जावे लागते असे दिसून आलेले आहे, या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेश्या निधी अभावी यशस्वी होणे जरा अवघडच ठरते.
महिला नेतृत्वातील स्टार्टअप, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी मधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करून राज्यात सुरू असणारा सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे (Punyshlok Ahilya Devi Holkar Women Startup Scheme) तसेच प्रोडक्ट बनवणे इत्यादी करिता देखील आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे.
राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे.
योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील पाठबळ देणे.
- राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपस व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्ट अप्सना व्यावसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे.
- राज्यातील महिला स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे.
- महिला स्टार्टअप च्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे.
- राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 01 लाख व जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येत आहे.
पात्रता
- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप असणे आवश्यक.
- सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक/सह संस्थापक याचा किमान 51% वाटा असणे आवश्यक.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 01 कोटीपर्यंत असावी.
- महिला नेतृत्वातील स्टार्टप यांनी राज्य शासनाच्या कोणत्या योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया
सदर योजने करिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, सरकार मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील.
निवड कशी होईल
प्राप्ता अर्ज पैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे, तुम्ही सुद्धा या स्टार्टअप साठी इच्छुक असाल तसेच 25 लाख पर्यंत सरकारतर्फे आर्थिक सहाय्य हवे असल्यास खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आत्ताच अर्ज करू शकता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
1 thought on “Women Startup Scheme : महिलांना व्यवसाय करण्यासाठी 01 लाख ते 25 लाखांचे आर्थिक साहाय्य सरकार देणार;असा करा अर्ज”